श्री. यजुर्वेंद्र अनिल महाजन

परिचय :   An Educationist, A Full Time Social Worker,Founder-Director of Deepstambh-Revolution in Education & Career in Rural India,Career Counsellor, Teacher Trainer, Personality Development Trainer, Social Entrepreneur, Books Published: 'अभ्यास मित्र' 'करिअर मित्र'
आवड :   Delivering Inspiring lectures to students, parents & teachers in rural as well as urban areas, Career Counselling, Competitive Exam awareness in rural area like Khandesh in Maharashtra.
आवडती पुस्तके :   हिंदू तेजा जाग रे, समग्र नयी तालीम, धडपडणा-या तरुणाईसाठी, A Better India A Better World, भारतीय संस्कृती, ताई मी कलेक्टर व्हयनु, उठा जागे व्हा, खरे-खुरे आयडॉल्स, या टीव्हीच काय करायचं?, बुर्झ्वागमन, कलंदराची राजवट, Jonathan Livingston Seagull by Richard Bach, Indomitable Spirit.
प्रेरणा :   स्वामी विवेकानंद, सुभाषचंद्र बोस, कर्मवीर भाऊराव पाटील, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, डॉ. बाबा आमटे, साने गुरुजी, महात्मा गांधी, सावित्रीबाई फुले
व्याख्याने - आजपर्यंत :   उत्तुंग भरारी घेऊया, उठा जागे व्हा, कुणीच कसं काही बोलत नाही?, देशासाठी काहीतरी केले पाहिजे, आपण समाजचं काही देणं लागतो, परीक्षेला सामोरे जाताना, स्पर्धा-परीक्षा व आपण, विकसित शिक्षक - समृद्ध भारत, आधुनिक मायबापांनो, तंत्रज्ञान शाप की वरदान, आधुनिकता व परंपरा अशा विविध विषयांवर संपूर्ण महाराष्ट्रात  १२०० च्यावर  व्याख्याने झालीत. या सर्व व्याख्यानांमधून मिळणारे मानधन  "कर्मवीर भाऊराव पाटील शिष्यवृत्ती योजने" अंतर्गत लाभार्थी विद्यार्थ्यांना निवास, भोजन व गुणवत्तापूर्ण मार्गदर्शन मिळण्यासाठी वापरले जाते.
पुरस्कार :   रोटरी क्लब दोंडाईचा तर्फे "श्रम साफल्य" पुरस्कार, क्षमता विकास प्रबोधिनी जळगाव तर्फे "व्याख्यान वाचस्पती" पुरस्कार, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज राष्ट्रीय पुरस्कार - २०१२, सार्थक फौंडेशन, जळगाव तर्फे "सार्थक युवा प्रेरणा पुरस्कार", गिरणा गौरव पुरस्कार २०१४
प्रकाशित पुस्तके :   अभ्यास मित्र, करिअर मित्र, पालक मित्र
ब्लॉग लिंक :   yajurvendramahajan.blogspot.in
विद्यार्थी मित्रांसाठी

मित्रांनो,
आयुष्याचा एका अत्यंत महत्वाच्या टप्प्यावर तुम्ही काहीशा ताणाचे, रुपेरी स्वप्नाचे, आशा-निराशेच्या हिंदोळ्याचे क्षण अनुभवत असाल. स्वतःच्या भवितव्याचा निर्णय घेण्याचा हाच क्षण आहे. जोपर्यंत तुम्ही उत्साहाने आणि टवटवीने मुसमुसलेले आहात तोपर्यंत ध्येयनिश्चिती करा. तुमच्या सा-या स्वप्नांना असंख्य धुमारे फुटू द्या. मोठे स्वप्न उराशी बाळगा. श्रेष्ठ आदर्श डोळ्यासमोर ठेवा. एकच ध्येय स्विकारा आणि ध्यानी-मनी-स्वप्नी त्याचेच चिंतन करा. कृती करा.

भान राखून नियोजन करा व बेभान होऊन अंबलबजावणी करा. यश तुमचेच आहे. तुमच्या प्रत्येकाच्या ठायी प्रचंड शक्ती आहे. त्याची जाणीव स्वतःला करून द्या.

निराशा, नकारात्मक विचार, न्यूनगंड यांना कधीही आपल्याजवळ फिरकू देवू नका. अडथळे, अडचणी, अपयश यांना सामोरे जा व त्यावर मात करा. स्वतःला कधीही कमी लेखू नका परंतु आपल्यात असलेल्या कमतरता जाणुन त्या दूर करण्याचा सर्वस्वी प्रयत्न करा. शिक्षणाचे माध्यम, आई-वडील, शाळा, शहर, सुविधा यामुळेच यश मिळविता येते असे नाही तर दुर्दम्य इच्छाशक्ती, जबरदस्त आत्मविश्वास, प्रचंड मेहनत याआधारे कुठलीही व्यक्ती यशस्वी होवू शकते.

आम्ही तरुणांनी तरुणांसाठी २००५ मध्ये जळगाव येथे दीपस्तंभची स्थापना केली. गुणवत्तापूर्ण शिक्षण हे फक्त शहरांचीच व श्रीमंतांचीच मक्तेदारी न राहता ग्रामीण भागातील श्रीमंत, गरीब, तळागाळातील सर्वांपर्यंतच पोहोचावे हा संस्थेचा मूळ उद्देश आहे. या माध्यमातून कर्तव्यदक्ष, प्रामाणिक, मेहनती, धाडसी व संवेदनशील नवी पिढी तयार व्हावी यासाठी अहोरात्र झटत आहोत.

यश म्हणजे फक्त पैसा किंवा पद नव्हे तर कुठल्याही क्षेत्रातील तुम्ही मिळविलेले कौशल्ये, गुणवत्ता, आनंद, समाधान, इतरांना सहकार्य करण्याइतपत क्षमता व तुमच्या सोबत असणा-या व्यक्ती ही खरी यशाची मानके आहेत. मौज-मजा, पाश्चात्य संस्कृतीच्या आहारी जाऊ नका. गरजे पुरते मर्यादीत महत्व द्या. लक्षात ठेवा आपली संस्कृती ही जगात सर्वश्रेष्ठ आहे व असेल.

या सुंदर जगात माणूस म्हणून जन्माला आलो आहोत. असं जगूया....असं स्वतःला व करिअरला घडवूया की हे जग अधिक सुंदर होईल....आणि आपले जीवनही!

तुमच्या सर्वांगीण विकासामुळेच आपला देश विकसीत बनणार आहे. तुम्हाला उत्तुंग भरारी घेण्यासाठी मनस्वी शुभेच्छा...!

Arise! Awake!
Stop not till the goal is reached!

तुमचा 'दीपस्तंभ' मित्र
यजुर्वेंद्र अनिल महाजन