कर्मवीर भाऊराव पाटील शिष्यवृत्ती योजना - स्वरूप

• अनाथ, गरीब विद्यार्थ्यांना विनामूल्य शिक्षण
• निवासासाठी 'गुरुकुल' योजना
• विनामूल्य पुस्तके व शैक्षणिक साहित्य
• उच्च शिक्षणासाठी अर्थसहाय्य
• प्रवास खर्च सहाय्य

दीपस्तंभ स्पर्धा परीक्षा शिष्यवृत्ती
देणगी पत्र - आपण समाजाचं काही देणं लागतो…

विनम्र आवाहन - समाजात हजारो गरीब व होतकरू विद्यार्थी आहेत. त्यांना आयुष्यात उभं करण्याची जबाबदारी आपली आहे. चला तर आपण सारे त्यांच्यासाठी सोबत काम करूया. आपल्याला शक्य असेल तेवढा कार्यासाठी वेळ देऊन तसेच आर्थिक योगदान देऊन सहकार्य करावे.

निधी पाठविण्यासाठी पत्ता व बँक खाते नंबर
दीपस्तंभ बहुद्देशीय संस्था
पत्ता- ४२, हौसिंग सोसायटी,सहयोग क्रिटीकल जवळ,जळगाव-४२५००१
फोन- (०२५७) ६५२२२९९,२२४२२९९

बँक खाते नंबर : ०३७९०१६०११०००१४
बँकेची नाव : कॉर्पोरेशन बॅंक, जळगाव शाखा
IFSC Code : CORP0000379

सन्माननीय देणगीदार

दीपस्तंभ फाउडेशनच्या योजनेत पन्नास हजार ते एक लाख पर्यंत उदार अंत:कारणाने विविध प्रकारे आर्थिक सहकार्य करणार्‍या व्यक्ती व संस्था:

ना. श्री. एकनाथरावजी खडसे, मुक्ताईनगर श्री. पुखराजजी पगारिया, पगारिया ऑटो
ना. श्री. गुलाबराव देवकर, जळगाव आ. श्री. सुरेशदादा जैन 
श्री. संजय गरुड, शेंदुर्णी प्रा. डी. डी. बच्छाव, सातपुडा ऑटोमोबाईल्स

दीपस्तंभ स्पर्धा परीक्षा शिष्यवृत्ती महाभियान देणगीदार :

श्री. लखनजी  भतवाल, धुळे सौ. जयश्री नरेंद्र पाटील, एरंडोल
श्री. राकेश महाजन श्री. योगेश अरविंद झांबरे, जळगाव
सौ. भारती राजेंद्र पाटील, जळगाव सार्थक फाऊडेशन, जळगाव
श्री. गोकुळ महाजन, ठाणे श्री. गोपाल दिनकर पाटील, निंबोल
श्री. भागवत विश्वनाथ पाटील, निंबोल श्री. रामदास त्र्यंबक पाटील, निंबोल
श्री. रविंद्र केशव पाटील, निंबोल टोणगावकर हॉस्पिटल, दॉडाईचा 
श्री. अच्चुत गोडबोल सर, मुंबई कु. श्रुती, चि. रजत भोळे, जलगाव
श्री. संदीप महाजन, पाचोरा श्री. विनोद रामलाल गायकवाड, जळगाव
चि. मयूर,  कु. शंतनू, नाशिक डॉ. हेमंत पाटील
श्री. नरेद्र परमानंद हरियाली, औरगाबाद श्री. सुरेश पाटील, पुणे
सौ. रत्नमाला सुभाष बेंद्रे श्री.  हेदरअली के. नुरांत
श्री. करीम सालार, जळगाव यशवंत चॅरिटीज, धुळे
श्री. पी. पी. माहुलीकर   श्री. मंदार कुंडे
सौ.  प्रतिभा पाटील, मुंबई श्री. अनिल त्र्यंबक सोनवणे, बहादरपूर
श्री. नंदकिशोर रानवटे, जिंताई, ता. फलटण श्री.  पी. डी. दलाल, धुळे
श्री.  प्रकाश महाजन, धुळे डॉ. उज्वला राठी,  एरंडोल
श्री.  प्रकाश मोतीराम तिडके, जळगाव श्री. निळकंठ अप्पा गायकवाड, जळगाव
श्री.  शेलेश कोलते, जळगाव प्रा. प्रदीपकुमार चोदंते, अहमदनगर
मार्गदर्शन समिती 
• डॉ. के.बी. पाटील • श्री. अ. ध. वसावे
• डॉ. रवींद्र टोणगावकर • श्री. नीलकंठ गायकवाड
• प्रा. प्रकाश पाठक • श्री. भरत अमळकर 
व्यवस्थापन समिती
• श्री. यजुर्वेंद्र महाजन • श्री. राजेंद्र पाटील • श्री. अनिल भोळे
• श्री. लक्ष्मण सपकाळे • श्री.  प्रमोद पाटील • सौ. सविता भोळे
• श्री. खेमचंद पाटील • श्री. मिलिंद थत्ते • श्री. रुपेश महाजन
• श्री. अमोल महाज • श्री. जगदीश महाजन • श्री. पी . डी . गावंडे
• श्री. अनुप चौधरी


काही प्रतिक्रिया...

विनोद कोतकर (सहकार अधिकारी, पुणे. मुळगाव - कोठली, ता. भडगाव, जि. जळगाव)
माझे वडील रिक्षा चालवितात. आर्थिक परिस्थिती नसतांनाही मी जे यश मिळविले ते दीपस्तंभ मुळेच. करिअरच्या वाटेत अचूक मार्गदर्शन, आत्मविश्वास, धैर्य, सहानुभूती व आर्थिक सहकार्य दीपस्तंभद्वारे अनेक विद्यार्थ्यांना दिले जाते. त्या व्यक्ती व संस्थांनी दीपस्तंभ द्वारे माझ्या सारख्या विद्यार्थ्यांचे आयुष्य घडविले. त्यांचे कोटी कोटी आभार....!

गायत्री ताराचंद शिंपी (शेवाडे, ता. शिंदखेडा, जि. धुळे)
लहानपणी वडील वारले, त्यातच पायाला अपंगत्व, आर्थिक परिस्थिती हलाखीची आहे. आईकडून शिक्षणाचा खर्च अशक्य होता. मी शिष्यवृत्ती दीपस्तंभ योजनेबद्दल ऐकले. मला सरांनी कार्यालयीन कामात 'कमवा व शिका' योजनेतून अर्थसाहाय्य दिले. शुल्क माफ केले. माझ्या जीवनात 'सकारात्मकता' आली. माझे दोनच आदर्श आहेत एक 'आई' व आमचे 'महाजन सर'!

अशोक वळवी (कात्री, ता. धडगाव, जि. नंदुरबार)
मी धडगाव तालुक्यासारख्या दुर्गम भागातला युवक. १०-१२ कि.मी. पायापीठ करून शिक्षण घेतले. रो.ह.यो. मध्ये रस्ते बांधणीत मजुरी केली, मात्र गरिबीमुळे पुढचे आयुष्य अधांतरी होते. मात्र एका मित्राकडून श्री. यजुर्वेंद्र महाजन सरांबद्दल ऐकले व जळगाव गाठले, दीपस्तंभद्वारे स्पर्धा परीक्षातून अधिकारी व्हायचंय. मार्गदर्शन तसेच गुणवत्तापूर्ण  मार्गदर्शन तसेच शिष्यवृत्तीमुळे संपूर्ण जीवन बदलून गेले आहे.

मा. पुखराजजी पगारिया (जेष्ठ व्यावसायिक व सामाजिक कार्यकर्ते)
माझ्यासारखे व्यापारी ज्यांना समाजासाठी खूप काही करायची इच्छा आहे, पण प्रत्यक्ष कार्य करू शकत नाहीत, ते दीपस्तंभच्या माध्यमातून आपली सामाजिक जबाबदारी पार पाडण्याचा प्रयत्न करतात. याद्वारे गरीब तसेच अनाथ विद्यार्थ्यांचे मायबाप होऊन त्यांचे आयुष्य फुलविण्याचे भाग्य व पुण्य लाभते.ही संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल मी दीपस्तंभ फाउंडेशनचे मनापासून कौतुक करतो व आशिर्वाद देतो.